मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला काका-पुतण्यांचा वाद नवा नाही. रायगड जिल्ह्यात असाच एक वाद सुरु होण्याची चिन्हं आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अवधूत तटकरे शिवसेनेच्या संपर्कात आहेत.
काही दिवसांपूर्वी अवधूत तटकरेंनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, अशीही माहिती आहे. अवधूत तटकरेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यास ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी असेल. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु असतानाच तटकरे कुटुंबीयांसाठी हा मोठा राजकीय धक्का असेल.
काय आहे वाद?
अवधूत तटकरे आणि सुनील तटकरे यांचे संबंध तणावाचे असल्याचं बोललं जातं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः तटकरे कुटुंबीयांच्या या भांडणात हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. पण याला फार यश आलं नाही. 2016 ला अवधूत तटकरेंच्या छोट्या भावाने शिवसेनेत प्रवेश केला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, सुनील तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अवधूत यांनी स्वतःची तयारी सुरु केली असल्याचं बोललं जात आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे शिवसेनेच्या संपर्कात - सूत्र
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Oct 2018 10:05 PM (IST)
अवधूत तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ते शिवसेनेच्या संपर्कात आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -