मुंबई : भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसेंनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. अशातच देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ आता एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार आजारी होते. त्यांच्यावर दोन शस्त्रक्रीया करण्यात आल्या होत्या. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. अशातच अनेक नेते शरद पवारांची भेट घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ आज राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मुंबईतील शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. दरम्यान, ही भेट सदिच्छा भेट असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. अशातच काल (मंगळवारी) देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुक्ताईनगरमधील कोथळी गावात एकनाथ खडसेंच्या घरी जाऊन रक्षा खडसे (Raksha Khadse) यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत भाजप नेते गिरीश महाजन देखील उपस्थित होते. त्यावेळी एकनाथ खडसे मात्र त्यांच्या घरी नव्हते, तर ते मुंबईत होते. यावरुनही राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. या दौऱ्यादरम्यान, रक्षा खडसेंच्या घरात असलेल्या कमळाच्या आकाराच्या घडाळ्याचीच चर्चा रंगली होती.
रक्षा खडसेंच्या घरातील 'घड्याळ' चर्चेत
देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुक्ताईनगरमधील कोथळी गावात एकनाथ खडसेंच्या घरी जाऊन रक्षा खडसे (Raksha Khadse) यांची भेट घेतली होती. एक गोष्ट निदर्शनात आली की, काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम करत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी रक्षा खडसे यांच्या घरातील कमळ आकाराच्या घड्याळ्यावर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा फोटो आहे. त्यामुळे रक्षा खडसेंच्या घरातील या घड्याळावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत खडसेंनी कमळाची साथ सोडत हातात घड्याळ बांधलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :