मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या जनसंपर्क अधिकाऱ्याचं व्हॉट्सअॅप अचानक बंद केल्याचा दावा केला आहे. "पीआरओ प्रशांत जोशी हे माझ्या राजकीय बैठका, परिपत्रक आणि बातम्या शेअर करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करतात," असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

हे कधीही ऐकलं नव्हतं. एखाद्या विरोधी पक्षनेत्याच्या पीआरओच्या व्हॉट्सअॅप, फोनवर बंदी आणणं म्हणजे देशात आणीबाणी लागू करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.

"माझं व्हॉट्सअॅप बुधवारी दुपारी अचानक बंद झालं. मी अॅप रिइनस्टॉल केलं तेव्हा मेसेज आला की या अकाऊंटवरुन व्हॉट्सअॅप सेवेच्या नियमांचं उल्लंघन झालं असून मोबाईल नंबर बंद करण्यात आला आहे," असं प्रशांत जोशी यांनी सांगितलं.