मुंबई : इकोफ्रेण्डली कुर्बानी म्हणजे आता मातीचा बोकड कापायचा का असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी विचारला आहे. शिवसेनेच्या इको फ्रेण्डली कुर्बानीमुळे मुस्लिम समाजानं माती खाल्ली का, असा टोलाही त्यांनी हाणला.


 
इकोफ्रेण्डली कुर्बानी म्हणजे आता मातीचा बोकड बनवून, कापून ती माती खायची का असा सवाल नवाब मलिक यांनी केला. मुस्लीम धर्मात 1800 वर्षांपासून कुर्बानीची परंपरा आहे. कुर्बानी दिलेल्या बोकडाचं मांस कुटुंबीय आणि गरिबांत वाटलं जातं. मात्र आता शिवसेनेच्या इको फ्रेण्डली कुर्बानीमुळे मुस्लिम समाजानं माती खाल्ली का, असा सवाल मलिक यांनी विचारला.

 
पोलिसांवरील हल्ले हे भाजपचेच कार्यकर्ते करत असल्याचं मलिक म्हणाले. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात ठिकठिकाणी खाकी वर्दीवर हात उचल्ल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं.