Kangana Ranaut statement on Sikh Community :
शीख समुदायाच्या तक्रारीवर एफआयआर
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर कंगनाने टीका केली होती. ही टीका करताना तिने या आंदोलनाचा संबंध एका फुटीरतावादी संघटनेशी असल्याचे सांगितले. त्यानंतर शीख संघटनांनी मागील महिन्यात खार पोलीस ठाण्यात कंगना रणौत विरोधात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी या महिन्याच्या सुरुवातीला कंगनाला चौकशीसाठी नोटीस बजावली होती. त्यानंतर कंगनाच्या वकिलाने ती 22 डिसेंबर रोजी पोलिसांसमोर उपस्थित राहील असे कोर्टात सांगितले होते. बुधवारी कंगनाच्या वकिलाने इतर दिवशी हजर राहण्याची परवानगी मागितली होती.
शीख संघटनेने केलेल्या तक्रारीवर खार पोलिसांनी कंगनाविरोधात एफआयआर दाखल केला होता. या एफआयआरविरोधात कंगनाने या हायकोर्टात धाव घेतली होती. पोलिसांनी कंगनाविरोधात 25 जानेवारी 2022 पर्यंत कोणतीही कारवाई करणार नसल्याचे म्हटले होते.
कंगनाने सोशल मीडियावर दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आंदोलन असल्याचे म्हटले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनात पंजाबमधील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता. कंगनाच्या या टिप्पणीनंतर शीख संघटनांकडून कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- नितेश राणेंच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक; 'त्या' ट्वीट विरोधात पोलिसांत तक्रार
- Crime News : आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला बंगळुरुमधून अटक
- पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा गोळीबाराची घटना, अकरावीत शिकणाऱ्या मुलावर गोळी झाडून हत्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha