नवी मुंबई : नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील दोन दिवसांपासून 650 ते 700 गाड्या भाजीपाल्याची आवक होत असल्याने दर उतरले आहेत. गेल्या काही महिन्यात भाजीपाल्याच्या किंमती वाढलेल्या होत्या. मात्र आता यामध्ये घट झाली आहे. सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाल्याने ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्यात आज नवी मुंबई भाजीपाला मार्केटमध्ये आवक  वाढल्याने भाजीपाला शिल्लक राहत आहे. 10 ते 15 रुपये किलो घाऊक बाजारात विकला जाणारा भाजीपाला 7 ते 10 रुपये किलोवर आला आहे. मात्र असं असलं तरी सर्वसामान्यांसाठी भाजीपाला महागच आहे. भाजीपाला दर 
भाजीप्रति किलो
कोबी7 रुपये
टोमॅटो6 रुपये
फ्लॉवर9 रुपये
गाजर13 रुपये
काकडी12 रुपये
वांगी10 रुपये
तोंडली13 रुपये
भोपळा8 रुपये
ढोबळी मिरची17 रुपये
भेंडी25 रुपये
पालक6 रुपये जुडी
मेथी10 रुपये जुडी
कोथींबीर10 रुपये जुडी