सातवीतील विद्यार्थिनीवर बलात्कार, नवी मुंबईतील शिक्षक अटकेत

Continues below advertisement
नवी मुंबई : नवी मुंबईतल्या नेरुळच्या एमजीएम शाळेतील नराधम शिक्षक हरिशंकर शुक्लाला अखेर दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. सातवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीवर शुक्लानं बलात्कार केला. पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर तिचा गर्भपातही करण्यात आला. विद्यार्थिनीच्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली, त्यावेळी मुख्याध्यापिका सविता गुलाटी यांनी कोणतीही दखल घेतली नाही. तसंच शाळा प्रशासनानंच धमकावल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे. दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. गुन्हे शाखेच्या 4 टीम शुक्लाचा शोध घेत होत्या. हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत शुक्ला ये-जा करत असल्यानं पोलिसांनाही त्याला पकडण्यात चांगलीच कसरत करावी लागली. हरिशंकर शुक्लाला पाठीशी घालणाऱ्या मुख्याध्यापिका सविता गुलाटीला पोलिसांनी आधीच अटक झाली आहे, तर तपासात हलगर्जी करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला देखील निलंबित करण्यात आलं आहे.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola