नवी मुंबई : पनवेल न्यायालयाचे न्यायाधीश सी. पी. काशीद यांच्या हाताला सापाने चावा घेतला. भरकोर्टात सकाळी 11 वाजताच्या सुमारास न्यायाधीशांना धामण चावली.

नेहमीप्रमाणे सकाळी न्यायाधीश काशीद कोर्टात आले. काही वेळातच त्यांच्या हाताला धामण चावली. त्यानंतर न्यायालय परिसरात एकच धावपळ उडाली.

सर्पमित्र दीपक ठाकूर यांना तातडीने बोलावण्यात आलं आणि त्यांनी धामण पकडली. साप बिनविषारी असल्याचं जेव्हा लक्षात आलं, तेव्हा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. न्यायाधीशांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं.

पनवेल न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात गवत असून त्याची निगा राखली जात नाही. त्यामुळे कोर्टात बरेच वेळा साप येत असल्याची माहिती आहे