मुंबई, ठाणे भागातील मॉल बंद असल्याने लोकांची गर्दी नवी मुंबई मॉलकडे वळू लागली असल्याचे स्पष्टीकरण यासाठी आयुक्तांनी दिलं आहे. गर्दीचं कारण सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र मॉलमध्ये गर्दी झाली असल्याचे मनपाकडे कोणते फोटो किंवा व्हिडीओ नाहीत. सोशल डिस्टन्सिंगची कारवाई कोणत्याही मॉलवर केलेली नाही. त्यामुळे मनपाने मॉल बंद करण्याचा अचानक निर्णय का घेतला? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रात गुगल क्लासरुम प्रकल्पाचं उद्घाटन; देशातील पहिलं राज्य ठरल्याचा अभिमान : मुख्यमंत्री
मॉल प्रशासनाकडून सर्व तयारी पण...
नवी मुंबई बरोबर इतर भागातून मोठ्या संख्येने लोकं मॉलमध्ये खरेदीसाठी येण्याची शक्यता असल्याने मॉल बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पुढील आदेश येईपर्यंत मॉल बंद राहणार आहेत. दरम्यान मॉलमध्ये सोशल डिस्टन्सिंग बरोबर सॅनिटायझर, टेम्प्रेचर गन, आयसोलेशन रूमची व्यवस्था करण्यात आली होती. मॉलमध्ये प्रवेश केलेली आणि बाहेर पडलेल्या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी सेन्सर मशीनही बसविण्यात आल्या आहेत.
मुंबईत रुग्ण वाढीचा सरासरी दर आता 1 टक्क्यापेक्षाही कमी
मुंबईत रुग्ण वाढीचा सरासरी दर आता 1 टक्क्यापेक्षाही कमी झाला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 70 दिवसांच्या पार गेला आहे. एवढेच नव्हे तर, मुंबईत कोरोनाची लागण तपासण्यासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांनी 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे दिनांक 28 जुलै 2020 रोजी एकाच दिवसात 11 हजार 643 चाचण्या करण्यात आल्या असून हा मुंबईतील एका दिवसातील चाचण्यांचा आतापर्यंतचा उच्चांकदेखील आहे.
Mumbai Rain | मुंबईत मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान; प्रभादेवी येथील इमारतीचा भाग कोसळला