मुंबई: कल्याणमध्ये किल्ला बनवताना वीजेच्या धक्क्याने एका लहान मुलाचा मृत्यू झालाय. अंकित लोणकर असं या मुलाचं नाव आहे.

कल्याण पूर्वेतील हनुमान नगरच्या राधेश्याम अपार्टमेंटमध्ये ही दुर्देवी घटना घ़डली.

दिवाळी असल्याने अंकीत आपल्या मित्रांसोबत किल्ला बनवत होता. मात्र वीजेचा धक्का बसल्याने त्याला जीव गमवावा लागला. या घटनेनं हनुमान नगरवर शोककळा पसरली आहे.