नवी मुंबई : नवी मुंबईतील सिडकोच्या तब्बल 15 हजार घरांची आज सोडत निघणार आहे. त्यामुळे कुणा-कुणाला घर मिळतं याकडे सर्व अर्जदारांचं लक्ष लागलं आहे. ऑनलाईन पद्धतीनं सकाळी 11 वाजेपासून या सोडतीला सुरुवात होणार आहे.


सिडकोच्या माध्यमातून घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी या पाच नोडमध्ये अल्प उत्पन्न आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी 15 हजारच्या आसपास घरं उभारली जात आहेत. अपेक्षेप्रमाणे या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि  15 हजार घरांसाठी लाखो अर्ज आले.


सिडकोच्या मुख्यालयात संगणकीय पद्धतीनं ही सोडत होणार आहे. त्यामुळे अर्जदारांना ऑनलाईल सोडत पाहता येणार आहे. त्यामुळे आजच्या सोडतीमध्ये कोण भाग्यवंत ठरणार हे काही वेळात स्पष्ट होणार आहे.


लॉटरीचा रिझल्ट पाहण्यासाठी अर्जदारांनी https://cidco.maharashtra.gov.in/#  या लिंकवर क्लिक करा. सोडतीनंतर घर लागल्यास अर्जदाराला एसएमएमद्वारे माहिती देण्याची सुविधा सिडकोने केली आहे.


सिडकोची तब्बल 14 हजार 838 घरांसाठी ही लॉटरी असून याचा फायदा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि अल्प उत्पन्न गटासाठी होणार आहे. सर्वसामान्य ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन सिडकोने विविध आर्थिक गटांसाठी नवी मुंबई क्षेत्रात पुढील वर्षभरात 55 हजार घरं बांधण्याचा निर्धार केला आहे.