तुकाराम मुंडेंच्या कारवाईविरोधात नवी मुंबई बंदचं आवाहन
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 15 Jul 2016 06:08 PM (IST)
नवी मुंबई: नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या कारवाई विरोधात सर्वपक्षीयांनी सोमवारी शहर बंदचं आवाहन केलं आहे. अनधिकृत बांधकामाविरोधात तुकाराम मुंढे यांनी जोरदार कारवाई सुरु केली आहे. यावरुन आता नवी मुंबईतलं वातावरण तापलं आहे. दरम्यान, याच प्रकरणावरुन आयुक्त तुकाराम मुंढे आणि भाजप आमदार मंदा म्हात्रे आमनेसामने आले आहेत. गावठाण भागातल्या अनधिकृत बांधकामांवरही हातोडा चालविण्यात येत आहे. आयुक्तांनी ही कारवाई करू नये अशी भूमिका म्हात्रे यांनी घेतली आहे. मात्र, सध्या अनधिकृतपणे सुरु असलेल्या बांधकामांवर कारवाई केली जात असल्याचं आयुक्तांनी म्हटलं आहे.