आयएनएस विक्रमादित्य ही भारतीय नौदलाची नौका आज सकाळी कारवार बंदरात प्रवेश करत असताना तिला आग लागली. जहाजावरच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित हालचाली करत आग आटोक्यात आणल्यामुळे जहाजाचं कोणतंही नुकसान झालं नाही.
लेफ्टनंट कमांडर डी. एस. चौहान यांच्या नेतृत्वाखाली चमूने आग विझवली. मात्र आगीमुळे पसरलेल्या धुराचा त्रास होऊन लेफ्टनंट कमांडर डी. एस. चौहान बेशुद्ध झाले. त्यांना कारवार येथील आएनएचएस पतंजली या नौदलाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.