Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, जाणून घ्या लाईव्ह अपडेट्स
Narendra Modi Mumbai BKC Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सत्राचं उद्घाटन करणार आहेत. भारत 40 वर्षांनंतर IOC सत्राचे यजमानपद भूषवत आहे.
आज भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर चागली कामगिरी करत आहे. तरुणांनी देखील चांगली कामगिरी केलीय. मला विश्वास आहे भारताला आयओसीचे सहकार्य मिळेल. खेळ फक्त मेडल जिकण्यासाठी नसतात तर त्या माध्यमातून सर्वांची मने जिकता येतात. खेळ जगाला जोडण्याचे एक सशक्त माध्यम आहे.
40 वर्षांनंतर भारतामध्ये आयओसीचे आयोजन होतंय. काही वेळेपूर्वी भारताने अहमदाबा मध्ये देशातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर विजय मिळवला. मी या विजयाबद्दल संघाचं आभार मानतो. खेळात कोणी लूजर नसतो तर जिकणारा आणि शिकणारा असतो. रेकॉर्ड केला तरी त्याचे स्वागत केलं जातं. आमचे सरकार खेळाला महत्व देण्यासाठी काम करत आहे.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत.
Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई विमानतळावर पोहचले आहेत.
पार्श्वभूमी
Narendra Modi Mumbai BKC Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई (Mumbai News) दौऱ्यावर आहेत. संध्याकाळी 5 वाजता मोदींचं मुंबई विमानतळावर आगमन होईल. तिथून ते बीकेसीमधील जिओ वर्ल्डच्या कार्यक्रमाला जातील आणि हा कार्यक्रम आटोपल्यावर नरेंद्र मोदी पुन्हा नवी दिल्लीला रवाना होतील. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं (International Olympic Committee) अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.
मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 141 व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) च्या अधिवेशनाचं उद्घाटन करणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) च्या सदस्यांची प्रमुख बैठक पार पडणार आहे. ऑलिम्पिक खेळांच्या भविष्याबाबत महत्त्वाचे निर्णय आयओसी अधिवेशनामध्ये घेतले जातात.
आशियाई स्पर्धांनंतर IOC सत्राबाबत उत्सुकता
भारत दुसऱ्यांदा आणि सुमारे 40 वर्षांच्या कालावधीनंतर IOC सत्राचं आयोजन करत आहे. IOC चे 86 वं अधिवेशन यापूर्वी 1983 मध्ये नवी दिल्ली येथे पार पडलं होतं. हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांमध्ये आयओसीच्या सत्राबद्दल उत्सुकता असणं स्वाभाविक आहे.
क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश
यंदाचं 141 वं IOC चं अधिवेशन भारतात आयोजित केलं जात आहे. जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी, क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि मैत्री, आदर आणि उत्कृष्टतेच्या ऑलिम्पिक आदर्शांना पुढे नेण्यासाठी राष्ट्राच्या समर्पणाचं प्रतीक आहे. या सत्रात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक आणि IOC चे इतर सदस्य, भारतीय ऑलिम्पिक संघटनेसह विविध क्रीडा महासंघांचे प्रमुख भारतीय क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती आणि इतर काही प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
आयओसी अॅथलीट्स कमिशनचे सदस्य आणि भारताचा आघाडीचा नेमबाज अभिनव बिंद्रा यासंदर्भात म्हणाला की, आयओसी सत्र भारतातील तरुणांना ऑलिम्पिक चळवळ अधिक जवळून समजून घेण्यास मदत करू शकतं. ऑलिम्पिक चळवळ खरोखरंच भारतातील तरुणांना चॅम्पियन बनण्यासाठी प्रेरित करू शकते. तरुण समाजाला नवी दिशा देण्यासाठीही सकारात्मक भूमिका बजावू शकतात. मुंबईतील आयओसी अधिवेशनात ऑलिम्पिकशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, ज्यात भविष्यातील ऑलिम्पिक खेळ, खेळांचा समावेश आणि वगळण्याशी संबंधित निर्णयांचा समावेश आहे.
दरम्यान, भारतात होणारं IOC चं 141 वं सत्र जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी, खेळातील उत्कृष्टता साजरी करण्यासाठी आणि मैत्री, आदर आणि ऑलिम्पिकच्या आदर्शांना पुढे नेण्यासाठी देशाच्या समर्पणाचं प्रतीक आहे. हे सत्र खेळाशी संबंधित सर्व भागधारकांमध्ये संवाद आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची संधी देईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -