मुंबई : आज पहाटेपासूनच नार्कोटीक्स ब्युरो पथकाने सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात धाडसत्र सुरु केलं आहे. सकाळीच एनसीबीची दोन पथकं रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल झाली होती. तर सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा याच्याही घरी एनसीबीचं एक पथक तपासासाठी दाखल झालं होतं. तब्बल तीन ते चार तासांच्या तौकशीनंतर आता एनसीबीने रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा याला ताब्यात घेतलं आहे.
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड विश्व ढवळून निघालं आहे. अशातच याप्रकरणात तपास करणाऱ्या नार्कोटिक्स ब्युरोने ड्रग्ज कनेक्शनमध्ये तपास सुरु केला आहे. आज सकाळीच सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या घरी एनसीबीची दोन पथकं दाखल झाली आहे. तसेच सुशांतचा हाऊस मॅनेज सॅम्युअल मिरांडा याच्याही घरी एनसीबीचं एक पथक तपासासाठी गेलं होतं. दरम्यान, याप्रकरणात रिया चक्रवर्तीला अटक होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु, आता एनसीबीने या प्रकरणी मोठी कारवाई करत, रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा याला ताब्यात घेतलं आहे.
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाती ड्रग अँगल समोर आल्यानंतर एनसीबीकडून वेगाने तपास सुरु आहे. एनसीबीच्या तपासा दरम्यान, सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांचे ड्रग्ज तस्करांशी संबंध असल्याचं समोर आलं. या प्रकरणाशी संबंधित अनेक ड्रग्ज तस्करांना अटकही करण्यात आली. यादरम्यान अधिक तपास करण्यासाठी एनसीबीचं एक पथक आज सकाळीच रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल झालं होतं.
रिया शौविकचं व्हॉट्सअॅप चॅट
रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती या दोघांमधली व्हॉट्सअॅप चॅट समोर आलं आहे. या व्हॉट्सअॅप चॅटमधून खुलासा झाला आहे की, रिया आपला भाऊ शौविककडे ड्रग्जची मागणी करत होती. एबीपी न्यूजला 15 मार्च 2020 रोजीचं व्हॉट्सअॅप चॅट हाती लागलं आहे. या चॅटमध्ये रिया आपला भाऊ शौविक चक्रवर्तीकडे ड्रग्जची मागणी करत आहे. रिया यामध्ये एका तिसऱ्या व्यक्तीचाही उल्लेख करत आहे. रिया म्हणत आहे की, तो दिवसातून चार वेळा पिचो, त्या अंदाजाने प्लान कर. त्यानंतर शौविक तिला म्हणतो की, 'आणि बड्स, त्याला पाहिजे?' रिया म्हणते, 'हो बडसुद्धा.' शौविक म्हणतो की, 'मी 5 ग्राम बडची व्यवस्था करू शकतो, यापासून 20 सिगरेट तयार होतात.'
दरम्यान, एनसीबीने आतापर्यंत चार अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक याचे अमली पदार्थ तस्कर, विक्रेत्यांसोबत संबंध स्पष्ट झाल्याचा दावा एनसीबीने केला आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड तसंच मुंबईतील उच्चभ्रू ग्राहकांना गांजा विकणाऱ्या अब्बास लखानी, करण अरोरा, झैद विलात्रा आणि बसीत परिहार या चार तरुणांना अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
ड्रग्ज प्रकरणात मुंबईत एनसीबीचं धाडसत्र, रियाच्या घराची झडती, सॅम्युअल मिरांडाच्या घरीही पथक
तब्बल 5 ड्रग्ज डीलर्सला ओळख होता शौविक चक्रवर्ती; भावाच्या व्हॉट्सअॅप चॅटमुळे रिया अडचणीत
रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून गौप्यस्फोट; वडिलांसाठी सप्लायरकडून घ्यायचा ड्रग्ज