मुंबई : "मी काल अहमदाबादमध्ये होतो, पण कोणालाही भेटलो नाही," असं सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत भेट झाल्याचं वृत्त फेटाळलं.


अहमदाबादमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत एकाच कारमध्ये प्रवास केल्याची दृश्य समोर आल्यानंतर नारायण राणेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राणेंनी ही दृश्यं खोटी ठरवत कोणाशीही भेट झाली नसल्याचा दावा केला.

तसंच मुख्यमंत्र्यांना अधिवेशाच्या काळात दोनवेळाच भेटलो होतो, असंही राणेंनी नमूद केलं.

अहमदाबादेत वैयक्तिक काम
"अहमदाबादमधल्या हयात हॉटेलमध्ये माझी वैयक्तिक मीटिंग होती. मी रात्री साडेदहानंतर कुठेही जात नाही. त्यामुळे मीटिंग आटोपल्यानंतर अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रश्चन नाही," असं राणेंनी सांगितलं.

"जर मी अमित शाह यांच्या घरी गेलो असं म्हणता, तर तिथला फोटो दाखवा. तिथून बाहेर पडतानाचा व्हिडीओ आहे का?" असा सवालही राणेंनी विचारला.



भाजपकडून जुनीच ऑफर
"मार्केटमध्ये चांगला माल असेल, तर सगळे विचारतातच ना," अशी कोपरखळी नारायण राणेंनी मारली. "भाजपकडून ऑफर येते, मात्र त्यावर अजून विचार केलेला नाही. भाजपच्या ऑफरला मी नकारही दिला नाही आणि होकारही दिला. कुणीही यावं आणि माझ्याशी बोलावं, एवढा स्वस्त मी नाही," असं नारायण राणेे म्हणाले.

रिपाइंची संधी हुकवली, नाहीतर आज केंद्रीय मंत्री असतो
"मला रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आपल्या पक्षात येण्यासाठी मला विचारलं होतं. मात्र, मी नकार देऊन संधी हुकवली, नाहीतर आज केंद्रीय मंत्री असतो,” असं नारायण राणे यांनी यावेळी म्हटलं.

राणे-मुख्यमंत्री एकाच सीटवर


दरम्यान, अहमदाबादमध्ये नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत प्रवास करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे याच गाडीत पुढच्या सीटवर नारायण राणे यांचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणेही असल्याचं दिसतंय.

‘माझा’च्या हाती लागलेल्या दृष्यांमध्ये नारायण राणे आणि मुख्यमंत्री मागच्या सीटवर बसललेले स्पष्ट दिसतात. तर नितेश राणे पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला पाहायला मिळतात.

काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली. मात्र काल राणेही अहमदाबादमध्ये होते. त्यामुळे नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला आहे.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

निर्णयाच्या वेळेला बोलेन, तेव्हाचं तेव्हा : नारायण राणे

राहुल गांधींनी सर्व ऐकून घेतलं, मात्र माझ्या तक्रारीचं निवारण नाही : नारायण राणे

मुख्यमंत्र्यांना अधिवेशनाच्या काळात दोनदाच भेटलो : नारायण राणे

भाजपकडून ऑफर येते, आता मार्केटमध्ये चांगला माल असेल, तर सगळे विचारतातच ना : नारायण राणे

परवा जयकुमार रावल घरी आले होते, त्यांच्याशी हॉलमध्ये बसून पक्षबदलाची चर्चा करु का? : नारायण राणे

कुणीही यावं आणि माझ्याशी बोलावं, एवढा स्वस्त मी नाही : नारायण राणे

मी अमित शाह यांच्या घरी सोबत असतानाचा फोटो दाखवा : नारायण राणे

मी अमित शहांच्या घरी गेलो म्हणता, मग तिथून बाहेर पडताना वगैरे व्हिडीओ आहे का? : नारायण राणे

रात्री साडेदहानंतर कुठेही जात नाही, त्यामुळे त्यांना भेटण्याचा प्रश्नच नाही : नारायण राणे

भाजपची ऑफर जुनीच, पण नकारही दिला नाही आणि होकारही दिला नाही : नारायण राणे

देवेंद्र फडणवीस आणि शाहांना भेटलो असतो, तर लपून राहिलं असतं का?: नारायण राणे

जर पक्ष बदलायचाच असता, तर आधी भेटायला गेलो नसतो, थेट निर्णय घेतला असता : नारायण राणे

वैयक्तिक कामासाठी अहमदाबादला गेलो होतो, सकाळी पावणे सात वाजता मुंबईत : नारायण राणे

काल मी अहमदाबादमध्ये होतो, पण कोणालाही भेटलो नाही : नारायण राणे

अहमदाबादच्या हयात हॉटेलमध्ये माझी वैयक्तिक मीटिंग होती : नारायण राणे

नारायण राणेंची संपूर्ण पत्रकार परिषद



संबंधित बातम्या

पुढच्या सीटवर नितेश, मागच्या सीटवर राणे-मुख्यमंत्री!

राणे अहमदाबादहून मुंबईकडे रवाना, शाह-फडणवीसांशी भेट?

नारायण राणे यांचा राजकीय प्रवास

नारायण राणे पुन्हा शिवसेनेत परतणार?

PHOTO : नारायण राणे, नितेश आणि मुख्यमंत्र्यांचा एकाच गाडीतून प्रवास