डोंबिवली : ‘बाळासाहेबांना जेवढा त्रास उद्धव ठाकरेंनी दिला तेवढा त्रास कोणत्याच मुलानं आपला बापाला दिला नसेल.’ असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केला आहे. डोंबिवलीमध्ये आज (गुरुवार) त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला होता. त्यावेळी ते बोलत होते.
नारायण राणे नेमकं काय म्हणाले? दरम्यान, यावेळी बोलताना राणेंनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर तुफान टीका केली. ‘मी भाजपमध्ये जाऊ नये, मंत्री होऊ नये याबाबत उद्धव ठाकरे रोज मुख्यमंत्र्यांना सांगतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी असा रडीचा डाव आता तरी खेळू नये.’ असा नारायण राणे यावेळी म्हणाले. आता राणेंच्या या गंभीर आरोपांना शिवसेना नेमकं कसं उत्तर देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, 1 तारखेला दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे पुढची दिशा स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे आता राणे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.
VIDEO : संबंधित बातम्या : नारायण राणेंचा नवा पक्ष लवकरच, एनडीएत सहभागी होणार? नारायण राणे पुढची वाटचाल 1 ऑक्टोबरला जाहीर करणार! राणे-शाहांच्या बैठकीत नेमकं काय काय झालं? हॉस्पिटलच्या उद्घाटनाचं आमंत्रण देण्यासाठी राणे दिल्लीत : दानवे राणेंकडे रिमोट कंट्रोल, तेच विरोधीपक्षनेता ठरवणार : नितेश राणे
Continues below advertisement
माझे बॉस नारायण राणे, त्यामुळे मला भीती नाही: नितेश राणे
माझ्या घरात दोन आमदार, राज ठाकरेंच्या पक्षाचा एकच आमदार : राणे
Continues below advertisement
मिलिंद नार्वेकरांकडून शिवसेनेत येण्याची ऑफर : नितेश राणे