मुंबईतल्या हाजी अली दर्ग्याजवळ कारचा भीषण अपघात
एबीपी माझा वेब टीम | 28 Sep 2017 10:33 PM (IST)
रस्त्यालगतचे लोखंडी बॅरिकेट तोडून ही कार कठडावरुन थेट समुद्रकिनारी आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला.
मुंबई : मुंबईतल्या प्रसिद्ध हाजी अली दर्ग्याजवळच्या समुद्रकिनारी काल (बुधवार) रात्री कारचा भीषण अपघात घडला. याप्रकरणी 35 वर्षीय कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एक लाल रंगाची वॅगन आर कार कठडा ओलांडून समुद्र किनाऱ्याजवळ उलटली. कारची अवस्था पाहून ती किती वेगानं पलटली असेल याची पुरेपुर कल्पना येते. मध्यरात्री दोन ते अडीच दरम्यान हा अपघात झाल्याचं समजतं आहे. रस्त्यालगतचे लोखंडी बॅरिकेट तोडून ही कार कठडावरुन थेट समुद्रकिनारी आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला. दरम्यान, अपघातात काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. VIDEO :