मुंबई : एकीकडे मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चा सुरु असताना दुसरीकडे विधानपरिषदेत मराठा समाजाच्या मागण्यांवर चर्चा सुरु आहे. यावेळी काँग्रेस आमदार नारायण राणेंनी मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळायला हवं. अशी जोरदार मागणी केली.
‘मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारकडून नियोजबद्ध कार्यक्रमाची आवश्यकता’
विधानपरिषदेत बोलताना नारायण राणे म्हणाले की, ‘सरकारनं जे आश्वासनं दिलं आहे त्याबाबत मी एकाच मुद्द्यावर लक्ष वेधतो. आरक्षणचा विषय सध्या कोर्टात आहे. त्यामुळे जर आरक्षण ठराविक कालावधीत मिळायचं असेल तर सरकारने नियोजनबद्ध कार्यक्रम जाहीर करणं आवश्यक आहे.’
‘मराठा समाजाच्या भावनेचा विचार व्हावा’
‘मुंबईत झालेल्या या मोर्चामध्ये ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते. आझाद मैदानावर जागा शिल्लक राहिली नव्हती. त्यामुळे आता मराठा समाजाच्या भावनेचा विचार करण्यात यावं.’ असंही यावेळी राणे म्हणाले.
‘शिक्षण आणि नोकरीत आरक्षण आवश्यक’
‘मराठा समाजसाठी शिक्षण आणि नोकरीत आरक्षण आवश्यक आहे. आजचा मोर्चा हा शेवटचा ठरवा अशी सरकारची इच्छा असेल तर लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावं. त्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात यावं.’ असंही राणे यावेळी म्हणाले.
‘संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर समाजातील विविध घटकांना आरक्षण देताना मराठा समाजाने सहकार्य केलं. त्यामुळे आता आमची अपेक्षा एवढीच आहे की, जे औदार्य मराठा समाजानं इतर समाजासाठी दाखवलं होतं तेच औदार्य आता त्यांनी दाखवावं.’ असं आवाहन राणेंनी केलं.
संबंधित बातम्या :
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मराठा मोर्चाचा समारोप
ओबीसींप्रमाणेच मराठा विद्यार्थ्यांना सवलती : मुख्यमंत्री
LIVE : मराठा मोर्चा : मी छत्रपती म्हणून नाही, मराठा समाजाचा घटक म्हणून मोर्चात: संभाजीराजे
भरगर्दीतून अॅम्बुलन्स अलगद वाट काढत गेली!
मोर्चेकरांचा परतीचा प्रवास सुखरुप व्हावा, ही सदिच्छा: शरद पवार
शेवटच्या मराठा मोर्चाकडून छत्रपतींची एक अपेक्षा!
संभाजीराजे छत्रपती मराठा बांधवांच्या मांडीला मांडी लावून आझाद मैदानात बसले!
आशिष शेलार यांना धक्काबुक्की, मात्र शेलारांचा इन्कार
रितेश देशमुखचं मराठा मोर्चाबाबत मध्यरात्री हटके ट्विट!
बाळासाहेबांचं पोस्टर ठेवलं, शिवसेनेचं पोस्टर फाडलं!