भरगर्दीतून अॅम्बुलन्स अलगद वाट काढत गेली!
एबीपी माझा वेब टीम | 09 Aug 2017 02:51 PM (IST)
मराठा क्रांती मोर्चांच्या शिस्तप्रियतेचं दर्शन आज मुंबईच्या रस्त्यावरही दिसलं.
मुंबई: मराठा क्रांती मोर्चांच्या शिस्तप्रियतेचं दर्शन आज मुंबईच्या रस्त्यावरही दिसलं. जे जे फ्लायओव्हरवरून आझाद मैदानात मोर्चा दाखल झाल्यानंतर, मोर्चातल्या स्वयंसेवकांनी मागे झालेला कचरा गोळा करुन परिसराची स्वच्छता केली. दुसरीकडे जे जे फ्लायओव्हरवरच एक अॅम्ब्युलन्स जात असताना तिला कोणताही अडथळा होणार नाही, याची काळजी मराठा मोर्चेकऱ्यांनी घेतली. इतकंच नाही, तर मोर्चाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मराठा आंदोलकांनी रस्त्याची एक लेन पूर्णपणे रिकामी ठेवली होती. गेल्या 57 मोर्चांमध्ये दाखवलेली शिस्त आजच्या मुंबईच्या मोर्चातही ठळकपणे दिसली.