नालासोपारा : नालासोपाऱ्यातील तरुणाने चार वर्षांनंतर आपल्या पित्याच्या हत्येचा सूड घेतला. आरोपी विशाल यादवने त्याच्या वडिलांच्या मारेकऱ्याची शुक्रवारी धारदार शस्त्राने हत्या केली.


45 वर्षीय प्रवीण दिवेकर यांची शुक्रवारी नालासोपाऱ्यामध्ये भररस्त्यात हत्या करण्यात आली. हत्या करुन आरोपी विशाल यादव पसार झाला आहे. नालासोपारा पश्चिमेला वाघेश्वरी हिल्समध्ये हरी ओम बिल्डिंगजवळ ही घटना घडली.

आरोपी विशालचे वडील मंगेश यादव यांची 2015 मध्ये हत्या करण्यात आली होती. प्रवीण दिवेकर याने इस्टेट एजंटच्या वादातून ही हत्या केली होती. याच हत्येचा सूड विशालने आपल्या एका साथीदारासोबत घेतला.

या प्रकरणी नालासोपारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरु आहे.