पालघर : नालासोपारा रेल्वेच्या प्रवाशांना आज मोटरमॅनच्या हलगर्जीपणाचा चांगलाच फटका बसला आहे. मोटरमॅनने लोकल (Nalasopara Local Train) चक्क स्टॅापिंग यलो पट्टीच्या पुढे थांबवली होती. त्यामुळे एसी लोकचे चार डबे फ्लॅट फॅार्म च्या पुढे निघून गेले.
चर्चगेट ते विरार एसी लोकलचे (Mumbai Local) चार डबे फ्लॅट फॅार्मच्या पुढे थांबल्याने प्रवाशांना ट्रॅकवर उतराव लागलं होतं. चर्चगेटहून निघालेली 3.28 ची एसी लोकल नालासोपारा रेल्वे स्थानकात फ्लॅटफॅार्म क्रमांक तीनवर 4:28 वाजता आली होती. मात्र या एसी लोकचे चार डबे फ्लॅटफॅार्म च्या पुढे जावून थांबले होते. त्यामुळे नालासोपाऱ्याला उतरणाऱ्या प्रवाशांनी जीव धोक्यात घालून ट्रॅकवर उतरून घरी परतले आहेत. तर काही प्रवाशी विरारहून परत आले आहेत. मोटरमनच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना नाहक त्रास झाल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला आहे.
गणेश विसर्जनाला मध्य रेल्वेवर मध्यरात्री 10 विशेष लोकल
अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मध्य रेल्वेकडून 10 उपनगरीय विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. मध्यरात्रीच्या वेळेस मध्य रेल्वेकडून या विशेष लोकलची तरतूद करण्यात आली आहे.
सीएसएमटी ते कल्याण, ठाणे दरम्यान 'या' वेळेस धावणार लोकल
छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावरुन कल्याण, ठाण्याच्या दिशेने डाऊन मार्गावर मध्यरात्री 1 नंतर या विशेष लोकल धावणार आहेत. सीएसएमटीवरुन कल्याणच्या दिशेने डाऊन मार्गावर मध्यरात्री 01.40 वाजता विशेष लोकल सुटेल. ही लोकल कल्याण स्थानकावर पहाटे 3.10 वाजता पोहोचेल. सीएसएमटीवरुन ठाण्याच्या दिशेने जाणारी विशेष लोकल मध्यरात्री 02.30 वाजता सुटेल आणि पहाटे 03.30 वाजता ठाण्याला पोहचेल. सीएसएमटीहून कल्याणच्या दिशेने आणखी एक विशेष लोकल चालवली जाणार आहे. पहाटे 03.25 वाजता ही लोकल सीएसएमटीवरुन स्थानकावरुन सुटेल आणि पहाटे 4.55 वाजता कल्याणला पोहोचेल.
कल्याण स्थानकावरुन मध्यरात्री 00.05 वाजता ही विशेष लोकल सुटेल आणि मध्यरात्री 01.30 वाजता सीएसएमटीला पोहचेल. तर ठाणे स्थानकावरुन मध्यरात्री 01.00 वाजता ही विशेष लोकल सुटेल आणि सीएसएमटीला 02.00 वाजता पोहोचेल. तर मध्यरात्री 02.00 वाजता दुसरी विशेष लोकल चालवली जाईल जी पहाटे 03.00 वाजता सीएसएमटीला पोहचेल.
हार्बर लाईलनवरही चालवली जाणार विशेष लोकल
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर सध्या रात्रकालीन मेगाब्लॉक सुरु आहे. पंरतु तरीही अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. सीएसएमटीहून बेलापूरच्या दिशेने विशेष लोकल ही मध्यरात्री 01.30 वाजता सुटेल आणि बेलापूरला 02.35 वाजता पोहोचेल.तर दुसरी लोकल ही सीएसएमटीहून 02.45 वाजता सुटेल आणि बेलापूरला 03.50 वाजता पोहोचेल. तसेच बेलापूरहून सीएसएमटीच्या दिशेने मध्यरात्री 01.15 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला 02.20 वाजता पोहोचेल.तर दुसरी लोकल ही मध्यरात्री 02.00 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला पहाटे 03.05 वाजता पोहोचेल.
ही बातमी वाचा: