मुंबई:  शिवसेनेच्या अल्टिमेटमनंतर भाजपमध्ये आता हालचालींना वेग आला आहे.


शिवसेनेनं पाठिंबा काढल्यास सरकार अल्पमतात येऊ नये, यासाठी भाजपकडून जुळवाजुळवीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 6 अपक्ष आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच शिवसेना आणि काँग्रेसचे आमदारही भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.

हे सहा अपक्ष आमदार कोण याबाबतच्या चर्चांना आता उत आला आहे.

राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानेच भाजप सत्तेत

असं असलं तरी, विधानसभा रेकॉर्डवर भाजपला शिवसेनेचा नव्हे तर राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे, त्यामुळे शिवसेनेने पाठिंबा काढला तरी सरकार अल्पमतात येणार नाही, असा दावा खुद्द भाजप खासदार नाना पटोले यांनी ‘माझा कट्टा’वर केला होता.

2014 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार

  1. कल्याण पूर्व – गणपत गायकवाड (अपक्ष)

  2. अहमदपूर – विनायकराव पाटील (अपक्ष)

  3. परभणी- पाथरी – मोहन फड (अपक्ष)

  4. जळगाव : अमळनेर- शिरीष चौधरी (अपक्ष)

  5. अमरावती अचलपूर – बच्चू कडू (अपक्ष)

  6. बडनेरा – रवी राणा (अपक्ष)

  7. पुणे: भोसरी- महेश लांडगे (अपक्ष)


संबंधित बातम्या

फडणवीस सरकार राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर सत्तेत: नाना पटोले

हे आहेत नवनिर्वाचित 288 आमदार