भाजप माझ्या रडारवर, नारायण राणेंचा इशारा
एबीपी माझा वेब टीम | 29 May 2016 10:10 AM (IST)

मुंबई : विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर नारायण राणे यांनी सोनिया गांधींचे आभार मानले. शिवाय, यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार घणाघात केला. विधानपरिषदेत गेल्यानंतर भाजप माझ्या रडारवर असेल, असा थेट इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिला आहे. भारतीय जनता पक्ष माझ्या रडारवर असेल. कारण राज्याचा मुख्यमंत्री भाजपचा आहे आणि भाजप बनवाबनवीचे सरकार आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली. विधानपरिषदेसाठी उमेदवारी देऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विश्वास दाखवला असून, त्यांचा ऋणी राहीन. शिवाय, त्यांचा विश्वास सार्थ ठरवेन, असे म्हणत नारायण राणेंनी आभार मानले. विधानपरिषदेत गेल्यानंतर सरकारविरोधात भूमिका मांडायला मिळेल, याचा आनंद आहे. मी अनेक मंत्रिपदं भूषवली आहेत, पण ज्या प्रकारे आताचं सरकार सूडाचं राजरकारण करतं आहे, ते चूक आहे, असे राणे म्हणाले. “माझ्या पराभवचा काळ हा वाईट होता, असे बोलणार नाही. कदचित, मला देवाने विश्रांती करायला संधी दिली, असे मी बोलेन.”, असेही राणे म्हणाले. नारायण राणेंशी खास बातचित :