अवघ्या दोन रुपयाच्या वादातून एकाची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 18 Apr 2016 03:08 AM (IST)
मुंबई: मुंबईच्या एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटील नगरमध्ये अवघ्या दोन रुपयांसाठी एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरजू साहनी असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सरजू साहनी रिक्षातून बोरिवलीतून रिक्षाने पाटील नगरला उतरले. मात्र दोन रुपये सुट्टे नसल्याच्या वादातून त्यांचं रिक्षावाल्यासोबत भांडण झालं. त्यावेळी सरजू यांना दोन जणांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत सरजू साहनी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरु आहे. सरजू हा वॉचमनचं काम करीत होता. तसेच त्याला दोन मुलं आहेत.