बारबालेची हत्या करणाऱ्या प्रियकराला कोलकात्यातून अटक
एबीपी माझा वेब टीम | 24 Nov 2016 12:03 AM (IST)
उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये बारबालेची हत्या करणाऱ्या प्रियकराला कोलकात्यातून अटक करण्यात आली आहे. राजेश खान असं आरोपीचं नाव असून त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जमिला खातून असं मृत महिलेचे नाव असून ती आशेळे गावात राहत होती. राजेश खान हा विवाहित असून त्याचे जमिलाशी प्रेमसंबंध होते. मात्र ती बारमध्ये काम करत असल्यानं राजेशचे तिच्याशी नेहमी भांडण व्हायचं. दोन दिवसांआधी झालेल्या भांडणातून त्यानं जमिलाची गळा चिरुन हत्या केली होती. हत्येनंतर राजेशनं कोलकात्याला पळ काढला. मात्र, मोबाईल ट्रेसकरुन पोलिसांनी राजेश खानला गजाआड केलं.