मुंबई: मुंबईतील दादर परिसरात सुनेनं सासूची हत्या करुन स्वत:ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अक्षता कनगुटकर असं या महिलेचं नाव आहे.
32 वर्षीय सुनेनं 70 वर्षीय सुनेची गळा दाबून हत्या केल्याची घटना दादर परिसरात घडली आहे. त्यानंतर सुनेनं विषप्राशन करुन आत्महत्या केली.
अक्षता कनगुटकर आणि लक्ष्मीकांत कनगुटकर यांचा 2000 साली विवाह झाला होता. वर्षभरानेच सासू सुनेमध्ये भांडण सुरू झाली. गेल्या काही दिवसात ती विकोपाला गेली होती. त्यातूनच हे कृत्य घडल्याचा प्राथनिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येतो आहे. दोघींना सायन हॉस्पिटलमध्ये नेल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आलं.