मुंबई : तब्बल 91 वर्षांच्या सेवेनंतर डीसी विद्युतप्रवाहावर धावणाऱ्या लोकलला सन्मानानं निरोप देण्यात आला. कुर्ला स्थानकाहून काल रात्री साडेअकरा वाजता हार-फुलांनी सजवलेली डीसी लोकल अखेरचा प्रवास करण्यासाठी निघाली आणि मध्यरात्री सव्वाबारा वाजता सीएसटी स्थानकात पोहोचली.
यावेळी खासदार राहुल शेवाळे, खासदार अरविंद सांवत, मध्य रेल्वेचे व्यवस्थापक सुनीलकुमार सूद, जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
https://twitter.com/Central_Railway/status/718877167879393286
या लोकलला कुर्ला ते सीएसटीदरम्यान प्रत्येक स्थानकात मध्य रेल सांस्कृतिक अकादमीच्या सर्व कलाकारांनी वाजतगाजत अखेरचा निरोप दिला. ही लोकल जेव्हा सीएसटी स्थानकात पोहचली तेव्हा तीचं ढोल-ताशे आणि बँड वाजवून स्वागत करण्यात आलं.. या विशेष लोकलच्या प्रवासासाठी रेल्वेनं10 हजार रुपयांचं तिकीट आकारलं होतं. मात्र त्याकडं प्रवाशांनी पाठ फिरवली.