मुंबई: रुग्णांना होण्याऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टानं 'मार्ड'च्या संपकरी डॉक्टरांना चांगलंच फटकारलं असून दोन तासात संप मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर मार्डच्या डॉक्टरांनी संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं आहे.
मुंबई हायकोर्टाच्या दट्ट्यामुळे अवघ्या 24 तासात मार्डला आपला राज्यव्यापी संप गुंडाळावा लागला. संपकऱ्यांच्या भावना आम्ही समजू शकतो, मात्र त्यामुळे राज्यभर रुग्णांना वेठीला धरणं योग्य नाही. त्यांचे हाल करणं बरोबर नाही. अशा शब्दात कोर्टानं मार्डला ठणकावलं. तसंच 2 तासात संप मागे घेण्यास बजावलं. त्यानंतर मार्डच्या प्रतिनिधींनी कोर्टाला तातडीनं आम्ही संप मागे घेत असल्याचं लेखी निवेदन दिलं
https://twitter.com/TawdeVinod/status/718788206012035072
https://twitter.com/TawdeVinod/status/718788392616607744
जे. जे. महाविद्यालयाचे डीन तात्याराव लहाने यांच्या बदलीसंदर्भात मात्र अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. दत्ता माने यांनी यासंदर्भातली याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी सुरु आहे. तुमच्या भावनांचा आदर करतो पण संप मागे घ्या, असं कोर्टानं मार्डला म्हटलं.
मुंबईतल्या जे. जे. महाविद्यालयाचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांची बदली केली जावी, अशी मागणी काही स्थानिक डॉक्टरांनी केली होती. डॉ. लहानेंकडून आपला मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप या डॉक्टरांनी केला आहे. त्यासाठी गेल्या ६ दिवसांपासून डॉक्टरांनी संप पुकारला आहे.
दुसरीकडे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडेंसोबत आज मार्ड संघटनेच्या डॉक्टरांची बैठक होत आहे. या बैठकीनंतर डॉक्टर संप मागे घेतील, अशी आशा आहे.
काय आहे वाद?
जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आणि नेत्रविभागाच्या प्रमुख रागिणी पारेख यांना हटवण्याच्या मागणीसाठी मार्डनं संप पुकारला आहे.
निवासी डॉक्टरांनी डॉ. तात्याराव लहाने आणि रागिणी पारेखांवर मानसिक छळाचा आरोप केला आहे. मात्र संप पुकारणाऱ्या डॉक्टरांविरोधात मेस्मा लावा असे आदेश विधान परिषदेच्या सभापतींनी दिले आहेत. तसंच विधानभवनात वैद्यकिय शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर मार्डविरोधात मेस्मानुसार कारवाई करण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.