मुंबई : एकीकडे मुंबईकरांना उद्यापासून पाणीकपातीची झळ सोसावी लागणार आहे तर दुसरीकडे पाणी पण महागणार आहे. कारण पाणीपट्टीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबईत पाणीपट्टीचे दर अडिच टक्क्यानं वाढले आहे. 16 जून पासून नवीन दरवाढ लागू होणार आहे.
Water tax Increase | मुंबईकरांचं पाणी महागलं, पाणीपट्टीच्या दरात अडीच टक्क्यांनी वाढ | ABP Majha
दरवर्षी जून महिन्यात पाणीपट्टीत वाढ करण्यात येत असते. दरवर्षी 8% पर्यंतची पाणीपट्टीवाढ करण्याचा अधिकार मुंबई महापालिका प्रशासनानं यापूर्वीच मंजूर करवून घेतलाय. त्याप्रमाणेच ही वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी 3.72 टक्के दरवाढ करण्यात आली होती. तर यावर्षी ही वाढ 2.48 टक्के असणार आहे. याबाबत पालिका प्रशासनाने स्थायी समितीमध्ये बुधवारी निवेदन केले.
घरगुती पाणीदरात सरासरी 10 ते 15 पैसे तर व्यावसायिक पाणीदरात 1 ते 4 रुपयापर्यंत वाढ झाली आहे. सध्या मुंबईत 10% पाणीकपात सुरु आहे. एकीकडे पाणीकपात सुरु असतांना प्रशासनानं केलेली पाणीपट्टीच्या दरातली वाढ ही अन्यायकारक असल्याचं विरोधकांनी म्हणटलं आहे.