मुंबई : संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटाने घेरलं आहे. अशात मुंबईत आता कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. आज (29 डिसेंबर) अडीच हजारहून अधिक कोरोनाबाधित आढळल्याने शासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. त्यात मुंबई आणि उपनगरीय भागात हवेची गुणवत्ता ढासळल्याने नागरिकांच्या आरोग्याला आणखी धोका निर्माण झाला आहे. PM2.5 या हाणिकारक सूक्ष्मकणांच्या हवेतील वाढीमुळे हवेची गुणवत्ता ढासळली आहे. मागील 10 दिवसांतील आकडेवारीनुसार कुलाबा, माझगाव, बीकेसी, चेंबूरमधील हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट आणि अति वाईट अशा श्रेणीत आली आहे.


या सर्वामुळे ग्लोबल रुग्णालयाचे  क्रिटीकल केअरचे प्रमुख डाॅ. प्रशांत बोराडे यांनी काही खास सल्ले आणि सूचना दिल्या आहेत, ज्या पाळून या प्रदूषणातही तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घेऊ शकता. डॉक्टर बोराडे यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सध्या कोरोना आणि सोबत वाढत्या वायू प्रदूषणामुळे मास्कचा वापर नेहमी करणं अतिशय गरजेचं झालं आहे. त्यामुळे कायम मास्क वापरण्याचा सल्ला बोराडे यांनी दिला आहे. तसंच अधिक प्रमाणात व्यायाम न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.  


काय आहेत PM2.5?


आपण सारेच जाणतो, की प्रत्येक प्रकारच्या हवेत असंख्य सूक्ष्मकण असतात. यातीलच एक म्हणजे PM2.5 आकारात अत्यंत सूक्ष्म असणारे हे कण मानवी आरोग्यासाठी धोकादायक असतात हे कण चिकटून कोरोना विषाणू फुप्फुसात प्रवेश करू शकण्याची मोठी भिती असल्याने या कणांची हवेतील वाढ सर्वांसाठी फार धोकायदायक आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha