मुंबई : मुंबईतील एम एस बी पोलिस ठाणे हद्दीत दहिसरमध्ये  एसबीआय बँकेवर आज  भर दिवसादरोडा पडला असून या दरोड्यात एका बॅंक कर्मचा-याचा मृत्यू झाला आहे. तर एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.  दोन अज्ञात   व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवित  बँकेतील अडीच लाख रुपयांची रोकड पळवली आहे. 

Continues below advertisement

मुंबईच्या दहिसर पश्चिमेत ही एसबीआय बँकेत असून आज दुपारी भर दिवसा गोळीबार करत फिल्मी स्टाईलने  बॅंक लुटण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच एम एस बी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.  तर या आरोपींचा शोध घेण्याकरता मुंबई पोलिसांची टीम तसेच मुंबई क्राइम ब्रान्चच्या टीम देखील लागल्या आहेत.

दहिसर येथे बँकेत आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींना बंदुकीचा धाक दाखवत अडीच  लाख रुपयांती रोकड पळवली. त्यानंतर गोळीबार करून मोटरसायकलवर पळून गेलेले आहेत अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

Continues below advertisement

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून बँका आणि इतर ठिकाणी दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी यावर कारवाई करत अनेक ठिकाणी गस्ती वाढवल्या आहेत. या वाढत्या घटना कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या असून त्यावर नियंत्रण आणण्याचे आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे. 

चाकूचा धाक दाखवून बँक कर्मचाऱ्याला लुटणाऱ्या पाच जणांना अटक; डोंबिवली पोलिसांची कारवाई

मुंबईतील एका खाजगी बँकेत कामाला असलेले  संतोषकुमार शर्मा हे डोंबिवली पूर्व भागातील ठाकूर्ली परिसरातील चामुंडा गार्डनमध्ये राहतात. 25 डिसेंबरच्या मध्य रात्री एक वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान संतोष कुमार रस्त्याने घरीत असताना  मास्क  परिधान केलेल्या चार ते पाच तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. या चोरट्यांनी संतोषकुमारला घेरले. त्याच्या गळयावर चाकू लावून त्यांच्याकडील दोन लॅपटॉप, महागडा मोबाईल एटीएम आदी सर्व घेऊन पसार झाले. या याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

इतर महत्त्वाच्या बातमी: