मुंबईत जॅग्वारच्या धडकेत चार जण जखमी
एबीपी माझा वेब टीम | 24 Jul 2018 08:01 AM (IST)
अपघातानंतर तेथील स्थानिकांनी जॅग्वार गाडीची तोडफोड करून चालकाला सुद्धा मारहाण केली. गाडीचा चालक हितेश गोलच्चा याला वर्सोवा पोलिसानी ताब्यात घेतलं आहे.
मुंबई : मुंबईतील वर्सोवा रोडवर सोमवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास भयंकर अपघात घडला. भरधाव जॅग्वार कारने चार जणांना धडक दिली. यात चारही जण जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. जॅग्वार कार सायंकाळी साडे सातच्या सुमारास वर्सोवा रोडहून भरधाव वेगात जात असताना कारने चौघांना धडक दिली आणि कार पुढे पार्किंगच्या वाहनांना जाऊन धडकली. यात रोडवरील 10 ते 12 वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. कार चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे सांगण्यात येतं आहे. अपघातानंतर तेथील स्थानिकांनी जॅग्वार गाडीची तोडफोड करून चालकाला सुद्धा मारहाण केली. गाडीचा चालक हितेश गोलच्चा याला वर्सोवा पोलिसानी ताब्यात घेतलं आहे.