शिवसेनेच्या प्रचारासाठी वासुदेव, ओव्यांतून उमेदवाराचं गुणगान
एबीपी माझा वेब टीम | 12 Feb 2017 11:10 AM (IST)
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचाराला चांगलीच धार चढली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचाराचे हटके फंडे अवलंबायला सुरुवात केली आहे. शिवसेनेने प्रचारासाठी थेट वासुदेवालाच साकडं घातलं आहे. घाटकोपरमध्ये शिवसेनेकडून उमेदवार सुरेश पाटील महापालिका निवडणुकांच्या रिंगणात आहेत. सुरेश पाटील यांनी प्रचाराच्या आखाड्यात थेट वासुदेवालाच उतरवलं आहे. त्यासाठी खास बारामतीहून वासुदेवांना पाचारण करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे कोणतंही मानधन न घेता पारंपरिक वेशात वासूदेव प्रचार करण्यासाठी अवतरले आहेत. यावेळी वासुदेव ओव्यांमधून शिवसेनेच्या प्रचारासोबत मतदानाविषयी जनजागृतीही करताना दिसत आहेत. दहा महापालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे महापालिकांवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.