Mumbai University News : मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार सुरू असून विद्यार्थ्यांचे पेपर चेक न करताच त्यांना नापास केल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. विद्यापीठाच्या या कारभाराविरोधात युवा सेनेचे आंदोलन सुरू आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सातत्याने होत असलेला गोंधळासाठी जबाबदार परीक्षा व मूल्यमापन संचालकांना पदमुक्त करावे अशी मागणी करण्यात येत आहे. तसचं मुंबई विद्यापीठाची चर्चगेटमधील जागा रुसा या शैक्षणिक उपक्रमाला देण्यासाचा निर्णय रद्द करण्याची मागणीही युवा सेनेनं केली आहे.
युवा सेनेच्या सर्व सिनेट सदस्यांनी विद्यापीठात भोंगळ कारभार सुरू असल्याचा आरोपक करत आंदोलन सुरू केलं आहे. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास रात्रभर आंदोलन करण्याचा इशाराही दिला. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सातत्याने होत असलेला गोंधळासाठी जबाबदार परीक्षा आणि मुल्यमापन विभागाच्या संचालिका डॉ. पुजा रौंदळे यांना पदावरुन मुक्त करावे अशी मागणी युवा सेनेने केली आहे.
या आधीही भोंगळ कारभार समोर
मुंबई विद्यापीठाच्या 1.64 लाख पदवी प्रमाणपत्रावर मुंबई या शब्दाचेच स्पेलिंग चुकल्याने विद्यापीठावर नामुष्की ओढावली होती. मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ जानेवारी महिन्यात झाला. दीक्षांत समारंभानंतर विद्यार्थ्यांना मिळालेल्या पदवी प्रमाणपत्रावर 'युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई' नावामध्ये 'Mumbai' ऐवजी 'Mumabai' छापण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला होता.
तब्बल एक लाख 64 हजार पदवी प्रमाणपत्रावर अशाच प्रकारे चुकीची छपाई स्पेलिंगची करण्यात आल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे ही पदवी प्रमाणपत्रं विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी किंवा भविष्यात इतरत्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
पदवी प्रमाणपत्र तयार करण्याचं काम मुंबई विद्यापीठाने एका खाजगी आस्थापनाला दिले होते. त्यांच्याकडून ही मोठी चूक झाली होती. त्यामुळे संबंधित आस्थापनाला काळ्या यादीत टाकण्याची मागणी युवा सेना सिनेट सदस्यांनी केली होती.
यंदा 1.64 लाख पदवी प्रदान
मुंबई विद्यापीठा्चया दीक्षान्त समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील 1 लाख 64 हजार 465 स्नातकांना पदव्या प्रदान आल्या. यामध्ये 85 हजार 511 मुली तर 78 हजार 954 मुलांचा समावेश आहे. यामध्ये पदवीपूर्व स्नातकांची संख्या 1 लाख 39 हजार 184 एवढी असून पदव्युत्तरसाठी 25 हजार 281 स्नातकांचा समावेश आहे.
ही बातमी वाचा: