Mumbai University: मुंबई विद्यापीठाने 2022 च्या प्रथम सत्राच्या उन्हाळी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या असून  19 एप्रिलपासून  परीक्षा  सुरु होत आहेत. यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन तर पारंपारिक कला, वाणिज्य, विज्ञान व स्वयं अर्थसहाय्यीत अभ्यासक्रमातील सत्र 6 च्या (चॉईस बेस ) नियमित व बॅकलॉगच्या परीक्षा या ऑनलाईन व प्रात्यक्षिक परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे.

सत्र 6 च्या परीक्षा या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या असतात, यानुसार या परीक्षांचा  निकालही वेळेवर जाहीर करणे आवश्यक असते. यावर विद्यार्थ्यांचे पुढील उच्च शिक्षण तसेच नोकरी अवलंबून असते. या परीक्षेचे निकाल वेळेवर जाहीर करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या एकूण लसीकरणाची संख्या तसेच कोकणातील एस.टी. महामंडळाच्या संपाची परिस्थिती, कोविडची परिस्थिती, वसतिगृहातील विद्यार्थ्यांची कमी उपस्थिती तसेच मुंबई विद्यापीठाचा भौगोलिक विस्तार, महाविद्यालयाची संख्या व विद्यार्थी संख्या तसेच पदवी परीक्षेचे अनेक विद्यार्थी परदेशी शिकण्यासाठी बाहेर जात असतात. त्यासाठी पदवीचे निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी पारंपारिक कला, वाणिज्य, विज्ञान व स्वयं अर्थसहाय्यीत पदवी अभ्यासक्रमातील सत्र 6 च्या (चॉईस बेस ) नियमित व बॅकलॉगच्या परीक्षा या ऑनलाईन घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे. मात्र सत्र 6 च्या परीक्षेतील प्रात्यक्षिक परीक्षा मात्र ऑफलाईन घेण्यात येणार आहेत.

2022 च्या हिवाळी सत्राच्या सर्व परीक्षा ऑफलाईन2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या 2022 च्या हिवाळी सत्राच्या सर्व विद्याशाखेच्या नियमित व बॅकलॉगच्या परीक्षा या ऑफलाईन घेण्याचा निर्णयही परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

पदवीच्या काही परीक्षा ऑफलाईन व काही ऑनलाईनपदवीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या सत्र 2 नियमित व बॅकलॉग परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील. तर सत्र 1, 3 व 5 बॅकलॉगच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येतील. सत्र 4 ची नियमित व बॅकलॉग परीक्षा ही ऑनलाईन घेण्यात येईल.

कला, वाणिज्य व विज्ञान पदव्यूत्तर परीक्षा ऑफलाईनसत्र 2 व  4 नियमित व बॅकलॉग ह्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील.सत्र 1 व 3 बॅकलॉगच्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येण्याऱ्या कला, वाणिज्य व विज्ञान पदवी व पदव्युत्तर परीक्षा या 50 टक्के बहुपर्यायी प्रश्न व 50 टक्के वर्णनात्मक प्रश्न या पद्धतीने घेण्यात येतील.

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन

  • व्यवस्थापन, तंत्रज्ञान व  आंतर-विद्याशाखेच्या परीक्षा ऑफलाईन व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या सत्र 1 ते 4 नियमित व बॅकलॉग परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील.
  • अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर व एमसीए या वर्गाच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील.
  • शिक्षणशास्त्र पदवी परीक्षा सत्र 2 व 4 परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील. तर सत्र 1 व 3 बॅकलॉग ह्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील.
  • आंतर-विद्या शाखेतील उर्वरित परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील.तसेच विधी शाखेच्या सर्व परीक्षा नियमित व बॅकलॉग ह्या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील.
  • मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग व उपपरिसरे यांच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील. 2022 च्या प्रथम सत्र उन्हाळी परीक्षेचे वेळापत्रक परीक्षा विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha