मुंबई: मुंबई विद्यापीठातील वाणिज्य विभागाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने  आता चार्टड अकाऊंटंट अर्थात सीएंची मदत घेण्याचं ठरवलं आहे.

मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालांमध्ये बहुतेक निकाल हा वाणिज्य विभागातील आहे. विद्यापीठीचे रखडलेले निकाल लावण्याची अंतिम तारीख ही 15 ऑगस्ट असून अवघे 4 दिवस राहिले आहेत.

त्यामुळे आता वाणिज्य विभागाचा रखडेलेला निकाल लावण्यासाठी सीए उत्तरपत्रिका तपासणार आहेत.

याआधीही विद्यापीठाने उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद विद्यापीठांची मदत घेतली होती.

आतापर्यत 307 अभ्यासक्रमाचे निकाल लागले आहेत, पण अद्याप 170 निकाल लागायचे बाकी आहेत. यामध्ये कॉमर्स आणि लॉ चे सर्वाधिक निकाल लागणे बाकी आहेत.