मुंबई :  मुंबई विद्यापीठाकडून (Mumbai University)  सिनेट निवडणुकीचे ( Senate Election Time Table) संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका आता थेट पुढल्या वर्षी एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. 21 एप्रिल 2024 रोजी सिनेट निवडणूक 24 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. नव्याने मतदार नोंदणी आजपासून सुरू होणार आहे. 


मुंबई उच्च न्यायालयात सिनेट निवडणुका स्थगित केल्याच्या विरोधात याचिका दाखल केल्यानंतर मुंबई विद्यापीठाने सुधारित संभाव्य निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान सिनेट निवडणुकांसाठी नव्याने मतदार नोंदणी करावी लागणार आहे.  त्यानंतर 21 एप्रिल 2024 रोजी सिनेट निवडणूक घेतली जाणार आहे. 24 एप्रिलला या सिनेट निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल, असं विद्यापीठाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकात जाहीर केला आहे


असे असणार सुधारित सिनेट निवडणुकांचे वेळापत्रक



  • 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023- नोंदणीकृत पदवीधर मतदार नोंदणी अर्ज भरण्याची तारीख

  • 1 डिसेंबर 2023 ते 25 फेब्रुवारी 2024- मतदार नोंदणी अर्ज छाननी, आक्षेप व मतदार यादी प्रसिद्धी 

  • 26 फेब्रुवारी 2024 - अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार

  • 29 फेब्रुवारी 2024 - निवडणूक अधिसूचना जाहीर करणार

  • 11 मार्च 2024 - उमेदवारी अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक 

  • 18 मार्च 2024-उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंबंधी लेखी कळविण्याची दिनांक

  • 20 मार्च - उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक

  • 21 एप्रिल 2024 -  सिनेट निवडणूक पार पडणार ( सकाळी 9 ते सायंकाळी 5 )

  • 24 एप्रिल 2024 - मतमोजणी पार पडणार


नव्या मतदार नोंदणी सुरू होत असताना याआधी मतदार नोंदणी शुल्क भरलेली यांनी पुन्हा मतदार नोंदणी शुल्क भरण्याची गरज नाही. याआधी जर मतदारांनी नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी या लॉगिन आयडीद्वारे अर्ज केले असतील त्याच लॉगिन आयडीद्वारे नव्याने नोंदणी करू शकतील.


सिनेट निवडणुकीवरून आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका


मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला स्थगिती दिल्याने राजकीय पक्षांसोबतच विद्यार्थी संघटना नाराज झाल्या  होत्या, तर  विरोधक देखील  आक्रमक झाले होते. सिनेट निवडणूक स्थगित झाल्यावरून आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) सडकून टीका केली होती. स्थानिक आणि लोकसभा निवडणुकीप्रमाणे मुख्यमंत्री सिनेट निवडणुकीला देखील घाबरले, असा टोला आदित्य ठाकरे  यांनी लगावला होता. 


सिनेट निवडणुकीच्या कार्यक्रमाला अचानक स्थगिती


मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 10 सप्टेंबर रोजी मतदान होणार होते. तर, 13 सप्टेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र अचानक या सिनेट निवडणुकीच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली होती. 
राजकीय पक्ष त्यासोबत विद्यार्थी संघटनांनी कार्यक्रम निवडणुकांचा जाहीर झाल्यानंतर त्यानुसार रणनीती आखून तयारी सुद्धा केली होती. मात्र  ऐनवेळी सिनेट निवडणुकीला स्थगिती दिल्याने नाराजी व्यक्त केली जात होती.


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI