मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2019-20 च्या अंतिम वर्ष/सत्राच्या परीक्षा आजपासून सुरु झाल्या. मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, विद्यापीठ शैक्षणिक विभाग आणि दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील विद्यार्थी या परीक्षांना प्रविष्ठ झाले होते. चारही विद्याशाखेअंतर्गत विविध अभ्यासक्रम आणि विषयांच्या परीक्षा आज सुरळीत पार पडल्या. अत्यंत सुलभ अशा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यापीठाने आणि महाविद्यालयांनी ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरुपात परीक्षा घेतल्या.


परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना नमूना प्रश्न पत्र व त्यांच्या सराव परीक्षाही घेण्यात आल्या आहेत. काही विषयांच्या सराव परीक्षा अजूनही घेतल्या जाणार आहेत. काही अपरिहार्य किंवा तांत्रिक कारणास्तव एखादा विद्यार्थी परीक्षेला बसू शकला नसेल अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.


राज्यातील विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप स्थगित; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लेखी आश्वासन


परीक्षांच्या यशस्वी आयोजनासाठी तज्ज्ञांची समिती


बॅकलॉग आणि नियमित परीक्षांच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाने विद्याशाखानिहाय महाविद्यालयांचे 94 समुह तयार केले आहेत. दरदिवशीच्या परीक्षांविषयक घडामोडी आणि अनुषंगिक बाबींसाठी विद्यापीठाने कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली निरीक्षण समिती तयार केली असून या समितीमध्ये प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांच्यासह सर्व अधिष्ठाता, सहाय्यक अधिष्ठाता, जिल्हानिहाय समन्वयक, प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ यांचा समावेश आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षांना प्रविष्ठ असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालये विशेष प्रयत्न करीत आहेत. आज पार पडलेल्या परीक्षांना समुह महाविद्यालयांनी त्यांच्या वेळापत्रकानुसार परीक्षांचे यशस्वी आयोजन करण्यात आल्याचेही डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.


कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद


अंतिम वर्ष/सत्राच्या परीक्षांना प्रविष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांना प्रथमच ऑनलाईन माध्यमातून परीक्षा द्याव्या लागत असल्याने अशा विद्यार्थ्यांच्या असलेल्या काही समस्या, अडचणी आणि शंकाचे निरसन व्हावे यासाठी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील महाविद्यालयातील सुमारे 5 हजाराहून अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले.


Last Year Exam|शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन;'या' विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलल्या