मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) 2020 च्या उन्हाळी सत्राच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यानुसार पदवीस्तरावरील अंतिम वर्षाच्या परीक्षा 3 ऑक्टोबर 2020 पासून तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा 8 ऑक्टोबर 2020 पासून घेण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या निर्देशानुसार या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या परीक्षा ऑनलाईन व बहुपर्यायी प्रश्नाच्या स्वरूपात घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आयडॉलच्या उन्हाळी सत्राच्या सर्व लेखी परीक्षा ह्या ऑनलाईन व बहुपर्यायी प्रश्नाच्या स्वरूपात घेण्यात येणार आहेत. यानुसार पदवीस्तरावरील तृतीय वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स व बीएस्सी आयटी सत्र 6 या अंतिम वर्षाच्या परीक्षा 3 ऑक्टोबर 2020 पासून घेण्यात येणार आहेत तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्ष एमए, एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी (गणित, आयटी व कॉम्प्युटर सायन्स ) व एमसीए सत्र 6 च्या परीक्षा 8 ऑक्टोबर 2020 पासून घेण्यात येणार आहेत.


मराठा आरक्षण स्थगितीच्या पार्श्वभूमीवर पदवी प्रवेशांचा पेच


प्रथम व द्वितीय वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स, बीएस्सी आयटी व एमसीए या अभ्यासक्रमाच्या पुनर्परीक्षार्थी/बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा 25 सप्टेंबर 2020 पासून घेण्यात येणार आहेत. तर पदवीस्तरावरील प्रथम व द्वितीय वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमाच्या 2019-20 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तसेच पदव्युत्तर प्रथम वर्ष एमए, एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम व एमएस्सी (गणित, आयटी, कॉम्प्युटर सायन्स) या अभ्यासक्रमाच्या 2019-20 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या व पुनर्परीक्षार्थी/बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नोव्हेंबर 2020 मध्ये घेण्यात येणार आहेत.


विद्यापीठाने दिलेल्या निर्देशानुसार या परीक्षा ऑनलाईन व बहुपर्यायी प्रश्नाच्या स्वरूपात घेण्यात येणार आहेत. या परीक्षा 50 गुणांच्या असतील व त्याचा वेळ एक तासाचा असणार आहेत. याचा अभ्यासक्रम आयडॉलने विद्यार्थ्यास दिलेल्या अध्ययन साहित्यावर आधारित असेल. विद्यार्थ्यांसाठी एक नमुना प्रश्नपत्रिका देण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या अनुभवासाठी सराव परीक्षा घेण्यात येणार आहे.


MU Final Year Exams: मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षेसाठी पॅटर्न जाहीर, अशी होणार परीक्षा