मुंबई : पहाटेच्या पडत असलेल्या धुरक्यामुळे मध्य रेल्वेने लोकलचं वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. धुरक्यामुळे कर्जत-कसाऱ्याहून निघालेल्या लोकलच्या सेवेवर परिणाम होत आहे. त्यामुळे ही समस्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने 15 डिसेंबरपासून या गाड्या 10 ते 15 मिनिटं आधी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
धुरक्यामुळे दृश्यमानता कमी होत असल्याने मोटरमनला सिग्नल दिसणं कठीण होत आहे. याचा परिणाम लोकल सेवेवर जाणवत असल्यामुळे मध्य रेल्वेनेकसारा आणि कर्जतहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे.
मात्र कल्याण-सीएसएमटी मार्गावरील लोकल गाड्यांच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही, त्या नेहमीच्या वेळेतच सुटणार आहेत.
कर्जत ते सीएसएमटी
गाडी बदललेली वेळ सध्याची वेळ
कर्जत ते सीएसएमटी मध्यरात्री 2.25 वाजता मध्यरात्री 2.35 वाजता
कर्जत ते सीएसएमटी पहाटे 3.31 वाजता पहाटे 3.41 वाजता
कर्जत ते सीएसएमटी पहाटे 4.27 वाजता पहाटे 4.32 वाजता
www.abpmajha.in
कर्जत ते सीएसएमटी पहाटे 4.39 वाजता पहाटे 4.47 वाजता
खोपोली ते सीएसएमटी पहाटे 4.40 वाजता पहाटे 4.50 वाजता
कर्जत ते सीएसएमटी पहाटे 5.45 वाजता पहाटे 5.53 वाजता
कसारा ते सीएसएमटी
गाडी बदललेली वेळ सध्याची वेळ
कसारा ते सीएसएमटी पहाटे 4.10 वाजता पहाटे 4.25 वाजता
कसारा ते सीएसएमटी पहाटे 4.45 वाजता पहाटे 5.00 वाजता
www.abpmajha.in
कसारा ते सीएसएमटी पहाटे 5.55 वाजता पहाटे 6.10 वाजता
कसारा ते सीएसएमटी सकाळी 6.35 वाजता पहाटे 6.45 वाजता