मुंबईत भरधाव टेम्पोने शाळकरी मुलांना उडवलं, विद्यार्थिनीचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 07 Nov 2017 02:30 PM (IST)
शाळेतून परतताना मार्वे रोडवरील जरीमरी मंदिराजवळ टेम्पोने त्यांना धडक दिली.
मुंबई : मुंबईत भरधाव टेम्पोने शाळकरी विद्यार्थ्यांना धडक दिल्याने एका मुलीचा मृत्यू झाला आहे. मालाड मालवणी परिसरातील मार्वे रोडवर ही दुर्दैवी घटना घडली. मुस्कान मेमन असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून ती 13 वर्षांची होती. तर नेहा मेनाली (वय 13 वर्ष), भुपेंद्र मेनाली (वय 9 वर्ष) आणि कमल मेनाली (वय 12 वर्ष) असं जखमी विद्यार्थ्यांचं नाव आहे. सर्व मुलं मालवणी परिसरातच राहत असून महापालिकेच्या शाळेत शिकतात. शाळेतून परतताना मार्वे रोडवरील जरीमरी मंदिराजवळ टेम्पोने त्यांना धडक दिली. यात मुस्कान मेमनचा मृत्यू झाला या प्रकरणी मालवणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर टेम्पो चालक पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पाहा व्हिडीओ