मुंबई: गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या पाठोपाठ आता राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना विरोधकांनी लक्ष्य केलं.


400 एकर जमीन भूखंडातून वगळल्याच्या आरोपाखाली, सुभाष देसाईंनी तातडीनं राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी आज विधानसभेत केली.

तर सुभाष देसाईंनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत.

दरम्यान देसाई आणि मेहतांवरून झालेल्या गोंधळानं विरोधकांनी सभात्याग केला.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी 600 एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र शिवसेनेच्या जवळच्या बिल्डरला फायदा मिळावा यासाठी यातली 400 एकर जमीन देसाईंनी आरक्षित भूखंडातून वगळल्याचा आरोप विरोधकांनी सुभाष देसाईंवर केला आहे.

विरोधकांचा दावा काय?

मेक इन महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत 2016 साली मॅग्नेटीक महाराष्ट्रचे करार करण्यात आले. मात्र, उद्योगधंद्यांना हवी असलेली जमीन मिळत नव्हती, त्यामुळे एमआयडीसीतील अधिसूचित जमिनीपैकी 60 टक्के जमीन वगळण्याचा निर्णय उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी घेतला, असा दावा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील गोंदेदुमाला येथील एमआयडीसीने संपादित केलेली 400 एकर जमीन सुभाष देसाई यांनी मूळ मालकाला परत केली. त्यामुळे उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

देसाई यांचं स्पष्टीकरण