मुंबई: यंदा मुंबई आणि उपनगरांमधील अकरावीच्या प्रवेश क्षमतेमध्ये वाढ होणार आहे.


मुंबई आणि उपनगरांमध्ये नव्या 14 महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली आहे. या महाविद्यालयांमध्ये 9 हजार 670 जागा वाढणार आहेत.

गेल्या वर्षी (2017-18) मुंबईमध्ये अकरावीची प्रवेश क्षमता 2 लाख 92 हजार 90 इतकी होती. यंदा ती 3 लाख 1 हजार 760 इतकी असेल.

मुंबईतील विद्यार्थ्यांचा गेल्या काही वर्षांचा प्रवेशाचा कल पाहता, वाणिज्य (कॉमर्स) शाखेच्या जागांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. कॉमर्सच्या 4 हजार 460 जागा वाढल्या आहेत.

विज्ञान शाखेच्या 3 हजार 760 जागा तर कला शाखेच्या 1 हजार 140 जागा वाढल्या आहेत.

किमान कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रमाच्या (एमसीव्हीसी) 110 जागा वाढल्या आहेत. त्यामुळे यंदा एकूण 800 महविद्यालयात 11 वी विद्यार्थ्यांचे प्रवेश मुंबई विभागसाठी केले जातील.

शाखा       प्रवेश क्षमता           ऑनलाइनप्रवेश          
                                          प्रक्रियेसाठी उपलब्ध जागा

कला           35,320              20,326
वाणिज्य     1,65,320           78,045
विज्ञान          94,770             42,324
एमसीव्हीसी  6,340              3, 899