मुंबई मेट्रोसाठी आरे कॉलनीचा गळा आणखी आवळणार
एबीपी माझा वेब टीम | 14 Jun 2017 09:25 PM (IST)
मुंबई : मुंबई मेट्रो 3 च्या कारशेडचा मुद्दा वादात असतानाच आता सरकारनं मेट्रो 7 साठीही आरे कॉलनीतली जागा हस्तांतर करण्याचा सरकारी आदेश काढला आहे. या आदेशामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप आमने-सामने येण्याची चिन्हं आहेत. आरे कॉलनीतली 5 एकर जागा अंधेरी ते दहिसर मेट्रो प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या रिसिव्हिंग सबस्टेशन, स्टील यार्ड आणि लेबर कॅम्पसाठी ही जागा देण्यात येणार आहे. याशिवाय या जागेवर मेट्रो भवनही उभारलं जाणार आहे. मागच्या आठवड्यात शिवसेनेनं या जागेवरचं आरक्षण बदलण्यासाठीचा सुधार प्रस्ताव धुडकावला होता. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे.