मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावर वाराणसी-मुंबई विमानाला अपघात झाला आहे. वाराणसीहून मुंबईला रात्री 10 वाजून 5 मिनिटांनी विमान दाखल झालं, पण लँडिंगच्यावेळी विमान रनवे 27 वरुन पुढे गेलं आणि चिखलात रुतलं.


वाराणसीहून मुंबईला आलेल्या स्पाईसजेटच्या विमानाला हा अपघात झाला आहे. रनवे 27 वरुन विमान पुढे गेल्यानं विमानाची चाकं चिखलात रुतली आहेत. या विमानातील 183 प्रवासी आणि क्रु मेंबर सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान विमान चिखलात रुतलं असून त्यातील प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे. तसंच विमानात कुढलीही आग किंवा धूर नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.