मुंबई : 19 वर्षाच्या तरुणाने चक्क आपल्या जन्मदात्या आईची सुपारी दिल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे. सुपारी घेऊन हल्ला करणारा तरुण आईवर वार करत असताना आरोपी मुलगा शांतपणे पाहत होता, अशी धक्कादायक माहिती आहे.
बोरीवलीतल्या शिंपोली गावात धर्मामाली सोसायटीत राहणाऱ्या धैर्य छेडा या तरुणाने आर्थिक वादातून हा हल्ला घडवला. पैशांवरुन आईशी झालेल्या वादाचा राग आरोपीच्या मनात खदखदत होता. त्यातून त्यानं मित्राला थेट आईला मारण्याची सुपारी दिली.
त्याचा मित्र आईवर चाकूनं वार करत असताना हा मुलगा तिथं शांतपणे उभा होता. आईचा आरडाओरडा ऐकून धावलेल्या शेजाऱ्यांनी तिला मुंबईच्या नायर रुग्णालायत दाखल केलं. आईची प्रकृती चिंताजनक आहे. तर पोलिसांनी आरोपी मुलगा धैर्य छेडा आणि त्याचा मित्र जबरार नाडारला ताब्यात घेतलं आहे. दोघांनाही 20 तारखेपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.