शिवसेनेने तिथीनुसार रविवारी, म्हणजे 4 मार्चला शिवजयंती साजरी केली. भांडुप परिसरात उपशाखाप्रमुख राजू मगरे यांनी शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात भोजपुरी गाण्यांवर नर्तिका नाचवल्याचा आरोप होत आहे.
कार्यक्रमात नाचणाऱ्या महिला कलाकारांवर पैसे उडवले जात असल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे. काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी प्रकाश सुर्वे यांच्यावर शरसंधान साधत भोजपुरी गाण्यांवर शिवजयंती साजरी केल्याचा आरोप केला होता.
शिवजयंतीला नाही, तर सत्यनारायणाच्या पूजेसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असा दावा आयोजकांनी केला आहे. नर्तिकांवर पैसे उडवले, त्यावेळी आम्ही तिथे नव्हतो, त्याचप्रमाणे भोजपुरी गाण्यांनंतर मराठी गाणीही सादर झाल्याची सारवासारव मगरेंनी केली.