मुंबई : मुंबईतील मागाठाणेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. प्रकाश सुर्वे हे आपले जैविक वडील असल्याचा दावा राज कोरडे या युवकानं केला आहे.


राजने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून प्रकाश सुर्वेंच्या डीएनए चाचणीची मागणी केली आहे. हायकोर्टात याचिका दाखल करण्यापूर्वी आमदार सुर्वे यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप राज कोरडेने केला. तसंच जीवे मारण्याची धमकीही दिल्याचं त्याने म्हटलं आहे.

माझ्या मुलाचं पालकत्व आमदार प्रकाश सुर्वे यांनी स्वीकारावं, अशी मागणी राज कोरडेच्या आईनं केली आहे.

दरम्यान, हा सर्व प्रकार आपली राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी सुरु असल्याचा दावा सु्र्वेंनी केला आहे. हे विरोधकांचं कारस्थान असल्याचा आरोपही आमदार सुर्वे यांनी केला आहे.



उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी आपले वडील असल्याचा दावा रोहित शेखर या युवकाने दावा केला होता. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर तिवारी यांची डीएनए चाचणी झाली आणि रोहित हा तिवारी यांचा जैविक पुत्र असल्याचं सिद्ध झालं. अखेर तिवारी यांनाही ते मान्य करावं लागलं होतं.