या भ्रष्टाचारातील 40 लाख रुपये काळा पैसा पोलिस घेत नाहीत, हे पैसै घ्यावेत म्हणून ही निदर्शनं करण्यात आली. पोलिसांनी आमदार बच्चू कडू आणि संदीप येवले यांना ताब्यात घेतलं.
संदीप येवलेंनी नेमके काय आरोप केले?
विक्रोळी पार्कसाईटमधील एसआरए पुनर्विकासातला घोटाळा लपवण्यासाठी ओंकार बिल्डरनं तब्बल 11 कोटी लाच देण्याची तयारी दाखवल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांनी केला होता. या 11 कोटींपैकी 40 लाख देतानाचं स्टिंग ऑपरेशन येवले यांनी सादर केलं होता.
संदीप येवलेंकडून सहाय्यक निधी स्वीकारण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
विक्रोळीतल्या पार्कसाईट भागातल्या हनुमाननगर झोपु योजनेत सुरु असलेला भ्रष्टाचार आणि त्यात बिल्डरनं सगळ्यांना कसं मॅनेज केलं याचे पुरावेही येवले यांनी समोर ठेवले होते.